सोलापूर-केंद्र सरकार विरोधात सोलापुरातील माकप व सिटूच्या वतीने सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. याला काँग्रेसने देखील पाठिंबा दिला होता. मात्र पोलिसांनी कोरोना नियमावलीवर बोट ठेवत यांच्या कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे हे आंदोलन होणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु सोमवारी माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर एमआयडीसी भागात कारखाने बंद करून आंदोलन करण्यात आले. यावेळी माकप आणि सिटूचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या प्रकारानंतर एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ आंदोलन स्थळी दाखल होत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला आहे.
देशभरातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाडीचा बंद-
देशभरातील सर्व शेतकरी संघटना आणि डाव्या आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार या बंदला सोलापुरातुन भाजप वगळता सर्व पक्षांनी आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता. सोलापुरातील सर्व व्यापारी दुकानदारांनी एक दिवसाचा बंद पाळण्याचे आवाहन माकप आणि डाव्या आघाडीकडून करण्यात आले होते. तसेच मार्केट यार्ड देखील बंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी अशा प्रकारचा कोणताही बंद करण्यास परवानगी नाकारली होती.
विविध मागण्यांसाठी बंद-