सोलापूर- वृध्द आई शारदा येमुल (वय 68 वर्षे, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांची पोटगीची रक्कम दोन लाख तीस हजार रुपये थकीत ठेवल्याबद्दल न्यायालयाने मुलाची संपत्ती जप्त किंवा विक्री करुन थकीत पोटगी रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश सोलापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी. चव्हाण यांनी दिले आहे.
आईस दरमहा दहा हजार पोटगी देण्याचा होता आदेश
वृध्द शारदा येमुल यांचा मुलगा रमेश येमुल व सून संध्या येमुल यांनी शारदा येमुल यांस राहत असलेल्या ठिकाणी सतत त्रास देऊन छळ करुन घरातून हाकलून दिले होते. तसेच त्यांच्या उपजिवीकेची सोय केली नव्हती. वृध्द शारदा येमुल यांच्यावतीने अॅड. श्रीनिवास कटकूर व अॅड. किरण कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात कौंटुबिक हिंसाचार कायदा, 2005 चे कलम 12 अन्वये पोटगी व राहण्यासाठी दोन खोल्या मिळाव्यात यासाठी फौजदारी खटला मुलगा व सुनेविरोधात दाखल केला होता. त्यानंतर या खटल्याची सुनावणी होऊन मुलाने आईस उपजिवीकेसाठी दरमहा दहा हजार रुपये पोटगी व राहण्यासाठी दोन खोल्या देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
न्यायालयाच्या आदेशापासून दिली नाही पोटगी