सोलापूर - भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विरभद्र बसवंती यांचा गेल्या वर्षी निधन झाला होता. प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भाजपाच्या नेत्यांनी बसवंती यांचा पुतळा अनावरण कार्यक्रम घेतला होता. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपा कार्यक्रमात आल्याबाबत विचारले असता, मृत्यूनंतर पक्ष बाजूला ठेवून कार्यक्रमात जाणे ही एक चांगली प्रथा आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Sushilkumar Shinde In Bjp Program : भाजपाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची उपस्थिती - काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे भाजपा कार्यक्रम
भाजपाच्या नेत्यांनी बसवंती यांचा पुतळा अनावरण कार्यक्रम घेतला होता. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपा कार्यक्रमात आल्याबाबत विचारले असता, मृत्यूनंतर पक्ष बाजूला ठेवून कार्यक्रमात जाणे ही एक चांगली प्रथा आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ईडीवर बोलणे टाळले :सुशीलकुमार शिंदे यांना ईडीच्या कारवायाबाबत विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. हा तर श्रद्धांजली कार्यक्रम आहे येथे बोलणे योग्य नव्हे, असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. पण केंद्रीय तपास यंत्रणा आता सोलापुरातील ग्रामीण भागात पोहोचली आहे. माढा येथील आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांच्या मुलाची चौकशी ईडीकडून केली जात आहे. सोलापूरच्या शहरी भागात ईडीची धाड कधी पडेल हे सांगता येऊ शकत नाही.सोलापुरातील राजकारणात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या कार्यक्रमाला अनेक नेते मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.
हेही वाचा -Hanuman Chalisa on Loudspeaker : घाटकोपरमध्ये मनसैनिकांनी लावली हनुमान चालीसा, पोलीस बंदोस्त तैनात