सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचे थैमान कमी होत आहे. परंतु म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. याची लागण झालेल्यांपैकी काही रुग्णांचे डोळे निकामी झाले आहेत, तर काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोलापुरात आजतागायत 216 जणांना म्यूकरमायकोसिसची लागण झाली आहे.13 जणांचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. चाळीसहुन अधिक जणांना कायमचा डोळा गमवावा लागला आहे. पण हा काळा बुरशी जन्य आजार कोरोना आजारातून बरे झालेल्यांना अधिक होत आहे. त्यामुळे कोरोना आजारातून बरे होणाऱ्याची सक्तीने रक्ताची तपासणी केली जाणार आहे. जेणेकरून त्यांना म्यूकरमायकोसिसची लागण होणार नाही किंवा त्यांवर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात रक्त तपासणी मोहीम तीव्र करणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिली.
शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांचा सोलापूर दौरा होता. या दौऱ्यावर असताना त्यांनी सोलापुरातील नियोजन भवन येथे सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोरोना महामारीवर आढावा बैठक घेतली.
हेही वाचा -'आई-बाबा बाय..' अशी चिठ्ठी लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
31 मे ते 5 जून दरम्यान जिल्हाभरात रक्ताची तपासणी केली जाणार-