महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अपयश लपवण्यासाठी सोलापुरकरांवर लॉकडाऊन लादला; माकपचा आरोप - लॉकडाऊन सोलापूर

केंद्र आणि राज्य सरकार सर्वांना मोफत अन्नधान्य, आर्थिक मदत, आरोग्याच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.उलट आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अतिरेक झाला. अनलॉक करून महिना उलटण्याच्या आधीच सरकार आपले अपयश लपवण्यासाठी, आणि जबाबदारी झटकण्यासाठी लॉकडाऊन लादत आहे.

अॅड एम. एच. शेख
अॅड एम. एच. शेख

By

Published : Jul 15, 2020, 7:33 AM IST

सोलापूर- शहरातील लॉकडाऊन फक्त प्रस्थापित आणि गलेलठ्ठ कमाई करण्याऱ्या व्यक्तींसाठी आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य कामगार व हातावर पोट असणारे बेरोजगारी उपासमारीने होरपळून जात आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 70 टक्के नागरिक लॉकडाऊनच्या विरोधात असताना सुद्धा प्रशासनाने सोलापूरच्या जनते विरुद्ध दहा दिवसांचे लॉकडाऊन लादला आहे. या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी नागरिकांनी १८ तारखेला घरासमोर निषेधाचे फलक लावून विरोध दर्शवण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अॅड एम. एच. शेख यांनी केले आहे. सरकार आपले अपयश लपवण्यासाठी नागरिकांवर लॉकडाऊन लादत असल्याचे आरोपही यावेळी केला.

देशभरात 72 दिवसाचा लॉकडाऊन हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच लावला होता. मात्र या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना आणि यंत्रणा उभी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे बाधितांची आणि मृतांची संख्या वाढतच आहे. या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार सर्वांना मोफत अन्नधान्य, आर्थिक मदत, आरोग्याच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. उलट आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अतिरेक झाला आणि कोरोनाची संख्या वाढतच राहिली. मात्र आता पुन्हा नव्याने लॉकडाऊन करून सरकार आपले अपयश लपवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

लॉकडाऊनला विरोध

मंगळवारी सकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा समितीची बैठक माकपचे राज्य सचिव व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर बैठकीत जिल्हा समिती सदस्यांसह सचिव मंडळ सदस्य,सिद्धप्पा कलशेट्टी, कुरमय्या म्हेत्रे, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी,युसूफ मेजर, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार, म.हानिफ सातखेड आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details