महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CNG Price Hike : सीएनजीच्या दरात 'एवढ्या' रुपयांची वाढ; सर्वाधिक दर सोलापुरात - सीएनजीच्या दरात वाढ

गेल्या तीनच दिवसांत सीएनजीच्या प्रतिकिलो दरात 15 रुपयांची वाढ ( CNG Price Hike ) झाली आहे. राज्यात सीएनजीचे सर्वाधिक दर सोलापुरात ( CNG Highest Price In Solapur ) आहे.

CNG Price Hike
CNG Price Hike

By

Published : May 7, 2022, 8:48 PM IST

सोलापूर -सीएनजीच्या दरात प्रचंड वाढ झाली ( CNG Price Hike ) आहे. सीएनजीचे 81 रुपयांवरून 96 रुपये प्रतिकिलो दर झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, चारचाकी वाहनधारक सध्या सीएनजीची वाहने घेताना दिसत आहेत. पण, सीएनजीच्या दरात देखील वाढ होत असल्याने वाहनधारकांची पंचायत होत आहे. गेल्या तीनच दिवसांत सीएनजीच्या प्रतिकिलो दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे. राज्यात सीएनजीचे सर्वाधिक दर सोलापुरात ( CNG Highest Price In Solapur ) आहे.

वाहनधारकांचा सीएनजी कडे वाढता कल - पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार केल्याने सोलापुरातील अनेक नागरिक सीएनजी वाहन खरेदी करत आहेत. कारण सीएनजीचे दर शंभर रुपयांच्या आतमध्ये आहे. वेगवेगळ्या शहरात याचे दर 60 ते 65 रुपयांपर्यंत दर होते. पण, गेल्या 1 एप्रिलपासून याचे दर सोलापुरात 81 रुपये प्रतिकिलो झाले आहे. मात्र, 3 एप्रिलला 15 रुपयांनी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिकिलो सीएनजीचा दर 96 रुपयांवर गेला आहे. सीएनजीत देखील पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे भाववाढ होत असल्याने वाहनधारकांची एकच पंचायत झाली आहे.

सीएनजी दरवाढ झाल्यानंतर वाहनधारकांची प्रतिक्रिया

सीएनजी पंप धारकाचा हलगर्जीपणा - सोलापूर शहरात ग्रामीण पोलिसांनी सीएनजी पंप सुरु केला आहे. पण, या ठिकाणी काम करणारे कर्माचरी सीएनजी भरताना हलगर्जीपणा दाखवत आहेत. अशीच एक घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. पंपावरील कर्मचाऱ्याने सीएनजी भरल्यानंतर नोजल पाईप वाहनामधून काढला नाही आणि चारचाकी वाहन धारक तसाच पुढे गेला. त्यामुळे स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा -Parag Agrawals Wife : गच्छंतीपूर्वीच पराग अग्रवाल यांची पत्नी विनिता अग्रवाल यांचा ट्विटरमध्ये प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details