सोलापूर -सोलापुरात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. आज शनिवारी शहर आणि जिल्ह्यात 1723 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर सोलापूर जिल्ह्यात एकूण 29 बाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सोलापूर स्थानिक प्रशासन कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी आणि जिल्हाबंदी करून देखील सोलापुरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. लॉकडाऊन आणि उकाड्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहे तर दररोज वाढत्या रुग्णांमुळेदेखील नागरिकांच्या मनात धडकी भरत आहे.
आज शनिवारी शहरात वाढले 289 रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू -
सोलापूर शहरात आज शनिवारी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने 2307 जणांची कोरोना तपासणी केली. यामध्ये 289 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 179 पुरुष आणि 110 स्त्रिया आहेत. उपचार घेत असताना सोलापुरात 9 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 पुरुष आणि 5 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि वाढते मृत्यूदर प्रशासनाला हादरे बसत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी 1434 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 871 पुरूष तर 563 स्त्रियांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. 20 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 पुरुष व 8 स्त्रिया आहेत. आज शनिवारी सर्वाधिक रुग्ण पंढरपुरात (310 रुग्ण) आढळले आहेत. माढा, माळशिरस बार्शी आदी तालुक्यातदेखील रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.