सोलापूर :भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत ( Sir Justice Uday Lalit of India ) हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल यांची राज्यस्तरीय वकील परिषद सोलापूर ( State Level Lawyers Council Solapur ) येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश उदय लळीत आहेत. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी सरन्यायाधीशांचे स्वागत करताना भारतातील तीन प्रमुख धर्मग्रंथ कुराण,बायबल आणि भागवत गीता ( Major scriptures are Quran Bible and Bhagavad Gita ) देत स्वागत केले आहे.
सरन्यायाधीश उदय लळीत हे पत्नी अमिता लळीत यांच्यासह उपस्थित राहिले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपकंर दत्ता व पत्नी झुमा दत्ता हे देखील प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत.
सोलापुरच्या सांस्कृतिक पद्धतीने स्वागत : सरन्यायाधीश उदय लळीत व पत्नी अमिता लळीत यांचा अस्सल सोलापुरी परंपरेत स्वागत करण्यात आले.ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे फोटो देण्यात आले.अमिता लळीत यांना इरकल साडी भेट देण्यात आली.मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश जस्टीस दीपकंर दत्ता व त्यांच्या पत्नी झुमा दत्ता यांना देखील शाल श्रीफळ, हँडलूम वर तयार केलेली साडी देत सत्कार केला.
न्यायव्यवस्थेतील मान्यवर सोलापुरात :राज्यातील न्यायव्यवस्थेत काम करणारे मान्यवर राज्य वकील परिषदेत उपस्थित आहेत.राज्याचे महाधिवक्ता ऍड आशुतोष कुंभकोणी ,सॉलिसिटर जनरल अनिल सिंग,मुंबई हाय कोर्टातील जस्टिस एम.एस कर्णिक,जस्टिस एन.जे.जमादार,जस्टीस विनय जोशी,जस्टीस उमेश आर.लळीत,बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन कुमार मिश्रा,ऍड उज्वलकुमार निकम, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,सोलापूर येथील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर जिल्ह्यातील इतर न्यायाधीश व वकील यांची प्रमुख उपस्थिती आहे.