सोलापूर - जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि केंद्र शासनाच्या मालकीची असणारी जिल्ह्यातील ( CBI action in NTPC company in Solapur ) एकमेव कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनटीपीसीत शनिवारी दुपारी सीबीआयची मोठी कारवाई झाली आहे. एनटीपीसीत एजन्सी ( security officer arrested for accepting bribe ) म्हणून कार्यरत असलेल्या यूपीएल कंपनीतील गोविंद कुमार या सुरक्षा अधिकाऱ्याला कंत्राटदार, पुरवठादार आणि कामगारांकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने शनिवारी दुपारी एनटीपीसी कंपनीच्या आवारात छापा टाकून लाचखोर अधिकाऱ्याला ( security officer in NTPC arrested in bribe case ) रंगेहाथ पकडले. सीबीआयने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या लाच घेणारा संशयित आरोपी जेलरोड पोलीस ठाणे येथील कोठडीत आहे. यामुळे एनटीपीसीत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
यूपीएल कंपनीत कार्यरत होता -सोलापुरात केंद्रीय प्रकल्प एनटीपीसी सुरू झाल्यापासून अनेक खासगी कंपन्यांना ठेका मिळाला आहे. युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड (युपीएल) या कंपनीला देखील ठेका मिळाला आहे. युपीएल कंपनीत गोविंद सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत होता. एनटीपीसीच्या एका वरिष्ठाने माहिती देताना सांगितले की, गोविंद कुमार हा यूपीएल या एजन्सीमध्ये काम करत होता. यूपीएल कंपनीचे मुख्यालय नोएडा उत्तर प्रदेश आहे. तो थेट एनटीपीसीच्या आस्थापनेवर नोकरीला नव्हता. सोलापूरच्या एनटीपीसीत अनेक कंपन्याना वेगवेगळ्या कामांचा ठेका मिळाला आहे.
युपीएल कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याला वैतागले होते -गोविंद कुमार या नावाच्या व्यक्तीला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. तो एनटीपीसी अंतर्गत असणाऱ्या युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड नावाच्या कपनीकडे सेफ्टी ऑफिसर (सुरक्षा अधिकारी) म्हणून कार्यरत होता. ही कंपनी ठेकेदार नेमणे, कंत्राट देणे आदी कामे करते. या कामांची जबाबदारी व सुरक्षा अधिकारी (सेफ्टी ऑफिसर) या पदाची जबाबदारी गोविंद कुमार याच्याकडे होती.