महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ग्रामीण भागातील रस्त्यांची प्राथमिकता निश्चित करून रस्ते विकास करा- उद्धव ठाकरे - News about Chief Minister's Village Road Scheme

राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य मार्ग यांना जोचडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा अशा सुचाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. ग्रामविकास विभागाच्या आढवा बैठकीत ते बोलत होते.

c-m-suggestion-to-develop-roads-by-setting-priority-of-roads-in-rural-areas
ग्रामीण भागातील रस्त्यांची प्राथमिकता निश्चित करून रस्ते विकास करा- उद्धव ठाकरे

By

Published : Feb 5, 2020, 10:28 PM IST

सोलापूर -राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य मार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा, हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांची प्राथमिकता निश्चित करावी अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामविकास विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सचिव प्रविण किडे, उमेदच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती आर. विमला आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रस्त्यांची प्राथमिकता निश्चित करून रस्ते विकास करा- उद्धव ठाकरे

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे उपक्रम सरकार प्राधान्याने पहात आहे. राज्यातील ग्रामीण रस्त्यांची कामे करतांना रस्त्यांचा दर्जा उत्तम राहील याकडे लक्ष केंद्रित करावे. ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे, त्यांच्यावर रस्त्यांची जबाबदारी निश्चित केली जावी असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या उपक्रमांना अधिक गती देण्यात यावी अशा सूचना दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details