पंढरपूर -तालुक्यात बहिणीने मनाविरुद्ध जाऊन पळून लग्न केल्याचा मनात राग धरून दोन भावांनी बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक ( Brothers killed sister's husband ) घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी तीन अनोळखी व्यक्तींच्या सहाय्याने संजय भगवान चव्हाण यांनी निर्घृण हत्या केली. सांगोला पोलिसांनी दोघा भावांना अटक केली.
सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व तपास अधिकारी हेमंतकुमार काटकर यांनी अवघ्या चोवीस तासांमध्ये कंटेनर चालकाचा खुनाचा तपास लावला आहे. आरोपी अनिल जकाप्पा पुजारी व सुनील जकाप्पा पुजारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे. कंटेनर चालक संजय चव्हाण हा अहमदाबाद येथे चालक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी अनिल आणि सुनील पुजारी यांच्या बहिणीसोबत संजय चव्हाण यांनी पळून जाऊन लग्न केले होते. यातच मनात राग धरून दोन भावांनी संजय चव्हाण यांचे अपहरण करून ठार मारले.
सांगोला पोलिसांची कामगिरी