सोलापूर- सांगली येथे झालेल्या मेळाव्यात समस्त पुरोहित वर्गाबद्दल चुकीचे विधान करत त्यांची बदनामी केल्या बद्दल आमदार अमोल मिटकरी ( MLA Amol Mitkari ) यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोलापुरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली. ब्राह्मण समाजातील पुरोहित वर्ग आणि काही समाजसेवक शुक्रवारी (दि. 22 एप्रिल) दुपारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन निवेदन देऊन माध्यमांशी संवाद साधला. गुन्हा दाखल न झाल्यास सोलापुरात मोठे जनआंदोलन उभे करू आणि जिल्हा न्यायालयात आमदार अमोल मिटकरी विरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती पुरोहित वर्गाचे नेतृत्व करणारे मनोज कुलकर्णी यांनी दिली.
आमदार अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा; ब्राह्मण समाजाची मागणी - अमोल मिटकरी
सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात समस्त पुरोहित वर्गाबद्दल चुकीचे विधान करत त्यांची बदनामी केल्या बद्दल आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोलापुरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली. ब्राह्मण समाजातील पुरोहित वर्ग आणि काही समाजसेवक शुक्रवारी (दि. 22 एप्रिल) दुपारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन निवेदन देऊन माध्यमांशी संवाद साधला. गुन्हा दाखल न झाल्यास सोलापुरात मोठे जनआंदोलन उभे करू आणि जिल्हा न्यायालयात आमदार अमोल मिटकरी ( MLA Amol Mitkari ) विरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती पुरोहित वर्गाचे नेतृत्व करणारे मनोज कुलकर्णी यांनी दिली.

बहुसंख्य ब्राह्मण बांधव यावेळी उपस्थित होते -फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही भूमिका घेतली. यावेळी प्रसाद देशमुख, वैभव कामतकर, अनिरुद्ध जोशी, राजाभाऊ कुलकर्णी, रंगनाथ उपाध्ये, हनुमंत हुंडेकरी, किरण उपाध्ये, दीपक कुलकर्णी, किरण कुलकर्णी, हर्षल जोशी, राजू निंबर्गी, उमेश काशीकर आदी ब्राह्मण बांधव व वेद प्रतिष्ठान, ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान, ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -राज ठाकरेंना मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच चॅलेंज; तुमचं ताफा मी अडवेन