सोलापूर -युती सरकारच्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्याना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वीजबिल उसाच्या बिलातून कट करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जा मंत्र्यांकडून जर वीज बिलाचा प्रश्न सुटत नसेल आणि मुख्यमंत्री, अर्थमंत्री ऐकत नसतील तर त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, अशा शब्दात भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठा खंडित करू नये, या मागणीसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.
महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन