सोलापूर -जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांच्या कार्यालयासमोर सोमवारी 12 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. सचिन चव्हाण या इसमाने पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न (self immolationin Zilla Parishad premises) केला. मोहोळ तालूक्यातील वाफळे येथील सचिन राजू चव्हाण या इसमाने अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी सचिन चव्हाण यांचा हा प्रयत्न हाणून (Attempted self immolation Zilla Parishad premises) पाडला. हा सर्व थरार सीईओ यांच्या कार्यालयासमोर घडत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अंगावर पेट्रोल अन हातात काडीपेटी असल्याने झेडपीत मोठी खळबळ उडाली होती.
Solapur Zilla Parishad : जिल्हा परिषद आवारात तरुणाने पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवण्याचा केला प्रयत्न ; 'हे' आहे कारण... - Solapur Zilla Parishad
जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांच्या कार्यालयासमोर सोमवारी 12 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. सचिन चव्हाण या इसमाने पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न (self immolation in Zilla Parishad premises) केला. मोहोळ तालूक्यातील वाफळे येथील सचिन राजू चव्हाण या इसमाने अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न (immolation by pouring petrol) केला. जिल्हा परिषदेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी सचिन चव्हाण यांचा हा प्रयत्न हाणून (Attempted self immolation Zilla Parishad premises) पाडला.
तक्रार करुनही दखल घेत नसल्याने टोकाचे पाऊल -सचिन चव्हाण यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, मोहोळ तालूक्यातील वाफळे येथील माणिक नलावडे यांनी ग्रामपंचायतीची बेकायदेशीर जागा हडप करून व्यापारी गाळे बांधले. या बेकायदेशीर कामकाजाबाबत आंदोलन करण्यात आले, तेव्हा झेडपी प्रशासनाकडून गाळे सील करण्यात आले होते. कोणती ही कायदेशीर परवानगी न घेता माणिक नलावडे यांनी सील तोडून व्यापारी गाळे खुले केले आहेत. यावर कारवाई व्हावी यासाठी चव्हाण यांनी सातत्याने प्रयत्न केला. मात्र मोहोळ बीडीओ अन् विस्तारधिकाऱ्यानी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. म्हणून आज टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती त्यांनी (Attempted self immolation in Solapur) दिली.
जिल्हा परिषद सीईओ यांनी कारवाईचे आश्वासन दिले -सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास सचिन चव्हाण यांनी सीईओ यांच्या कार्यालयाबाहेर पेटवून घेण्याचा प्रयत्न (immolation by pouring petrol) केला. जवळपास दोन तास सोलापूर जिल्हा परिषद आवारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व घडामोडीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने वाफळे येथील गाळयांची संपूर्ण माहीती मागवली आहे. बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याचे सचिन चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.