सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला सोलापुरातील टोल नाक्यांवर केराची टोपली दाखवली जात आहे. वारकऱ्यांसाठी टोल माफीच्या निर्णय पालन केले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव्य सोलापूर-पुणे महामार्गावर सावळेश्वर टोल नाक्यावर दिसून आले.
टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल मागितले -सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका येथे शुक्रवारी सकाळी एकामागून एक गाड्या टोल नाका पास करीत होत्या. भगवा झेंडा लावून आलेली वारकऱ्यांची जीप टोलनाक्यावर आली. टोल वर येताच जीप मधील वारकऱ्यांनी विठ्ठलाचा जयघोष केला. नाक्यावरील कर्मचाऱ्यांने टोलच्या पैशाची मागणी केली. यावेळी त्या गाडीतील वारकऱ्यांनी सांगितलं आम्ही वारकरी आहोत. पंढरपूरला निघालोय मुख्यमंत्र्यांनी टोलमाफी केली आहे टोल घेऊ नका असे सांगितले. पण टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी काहीही न ऐकता टोल द्या आणि वाहन पुढे घेऊन जा असे सांगितले. यावरून वारकरी वाहनधारक आणि टोल कर्मचारी यांमध्ये वाद झाला.
हेही वाचा-Uddhav Thackeray Led Faction : शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा झटका, शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देणारी याचिका तातडीने घेण्यास नकार
हजारो वाहने सोलापूर-पुणे महामार्गावरून जातात-आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे साजरा केला जातो. कोरोनामुळे दोन वर्षे आषाढीवारी रद्द झाली होती. पण, यावर्षी आषाढ वारी निर्बंधमुक्त झाल्याने अनेक भाविक, वारकरी पंढरपूरकडे जात आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटकपह अन्य जिल्ह्यातील हजारो वाहने सोलापूर मार्गे पंढरपूरला जात आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर टोलच्या पैशाची मागणी केली जाते असा आरोप लोहारा तालुक्यातील शरणाप्पा कडबाने, भास्कर पाटील, अमोल गायकवाड, महादेव धारुळे, शिवाजी गायकवाड, जगदाळे आदींनी व्यक्त केली.
फास्टटॅग वरून ऑनलाइन टोल वसुली-राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या प्रत्येक गाड्यांना फास्टटॅग बंधनकारक केले आहे. टोलनाक्यावरील होणारी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी अनेक वाहनांच्या समोरील काचेवर फास्टटॅग बसवण्यात आले आहे. टोल माफीचा निर्णय घेण्यात आला असला तरी, वारकऱ्यांचे वाहन टोलनाक्यावरून गेले असता टोल वसुली होत आहे. तसा मेसेज व वाहनधारकांच्या मोबाईलवर येत असल्याचे वाहनधारक सांगत आहेत.
हेही वाचा -Shiv Sena Chief Uddhav Thackeray Statement : शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही हिरावू शकत नाही - उद्धव ठाकरे