सोलापूर - शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का, राहुल गांधी-शरद पवारांनी उत्तर द्यावे असे सोलापुरातील सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) म्हणाले. तर अजित पवार हे दोन वर्षापूर्वी ४८ तासांसाठी 'दुल्हे' झाले होते, एखाद्या मुस्लिम नेत्याने जर असे केले असते तर त्यांना पक्षातून बाहेर काढले असते. त्यांच्यामागे पोलीस आणि शासकीय यंत्रणांना लावले गेले असते. सोलापूर येथील एमआयएमच्या कार्यक्रमात ओवेसींचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात सेक्युलिरझमला 'दफन' केले अशी टीकाही असदुद्दीन ओवेसींनी केली.
सेक्युलर म्हणून मिरवणाऱ्यांनी शिवसेनेसोबत केली आघाडी -
ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम पक्षाचा मेळावा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, फारूक शाब्दी आदी नेते उपस्थित होते. यावेळी खासदार ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि अजित पवार यांवर सडकून टीका केली. सेक्युलर म्हणणारे जनतेची फसवणूक करत आहेत. जातीच्या आधारवर असलेल्या शिवसेनेसोबत यांनी सरकार स्थापन केली.व तसेच अजित पवार यांनी भाजप सोबत पहाटेचा शपथविधी उरकून टाकला होता.अजित पवार यांनी राष्ट्रवादीला घेऊन भाजप सोबत 48 तासांचे लग्न करून घेतले होते.असा घणाघात करत खासदार ओवेसींनी मुस्लिम आरक्षणावरदेखील प्रश्न असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केला.
मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज -