महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लेखनीचे राजे आण्णा भाऊ माझे....गाण्यातून अण्णाभाऊंचा जागर

या अगोदर निता देवकुळे यांनी ८ हुन अधिक गाण्याचे लेखन करीत त्याचे गायन देखील केले आहेत. निता देवकुळे यांना २०१७ साली महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.

निता देवकुळे
निता देवकुळे

By

Published : Aug 1, 2021, 12:01 PM IST

माढा (सोलापुर) -माढ्यातील निताताई गौतम देवकुळे या केवळ माढा नगरपंचायतीच्या महिला सफाई कामगारच नसून उत्कृष्ट गायक आणि गीत लेखक देखील आहेत. विशेष म्हणजे देवकुळे यांचा मुलगा निलेश देवकुळे हा देखील प्रख्यात ढोलकीपटू आहे.

गाण्यातून अण्णाभाऊंचा जागर
या अगोदर निता देवकुळे यांनी ८ हुन अधिक गाण्याचे लेखन करीत त्याचे गायन देखील केले आहेत. निता देवकुळे यांना २०१७ साली महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी निता देवकुळे गीत लेखन करुन गायन करतात. त्यांनी यंदाच्या जन्मोत्सवानिमित्त अण्णाभाऊ माझे साहित्यात नाव शोभले. अण्णाभाऊ या दुनियेत गाजले या गीताचे लेखन केले. हे गीत सध्या ठिकठिकाणी जन्मोत्सवानिमित्त वाजू लागले आहे.


अनेकांच्या मनात हे गीत घर करुन गेले आहे. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी दररोज पहाटे ५ वाजताच शहराची स्वच्छता करण्यासाठी उठतात. त्यांचे शिक्षण अवघे ४ इयत्ते पर्यंतचे असून, शास्त्रीय संगीताचे शिक्षण नाही. केवळ इच्छाशक्ती,आत्मविश्वासाच्या जोरावर निता देवकुळे यांनी गीतलेखन केले आहे. पती गौतम, मुलगा निलेश, सुमित यासह सर्वच कुटुंबियांची साथ निता देवकुळे यांना मिळते. माढा नगरपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना नोकरीत घेण्यात यावे यासाठी देखील निता देवकुळे मुलगा सुमित सोबत समवेत सरकारी पाठपुरावा करतात. भाऊ शाहीर बापू पवार हेच मला नेहमीच मार्गदर्शक असल्याचे ते आवर्जून सांगतात. शिक्षण कमी असताना सुध्दा अंगात कला असल्यास यशस्वी होता येते. इच्छा असेल तर मार्ग दिसेल हा मंत्रही महिलांना देवकुळे यांनी कृतीतून दाखवून दिला आहे.

स्वयंपाक करताना सुचले गाणे
लेखनीचे राजे आण्णा भाऊ माझे ..हे गीत मला स्वयंपाक करताना सहज सुचले. मी लगेचच ओळी तयार करुन सुमितला म्हणून दाखवल्या. आणि एकच दिवसात लेखन करीत त्याचे गायनही केले. माझे भाऊ शाहीर बापु पवार हेच माझे आदर्श आहेत. त्यांचा वारसा घेऊन माझी वाटचाल पुढे सुरुच राहील. महिलांनी अंगातील कलेचे सादरीकरण करणे गरजेचे आहे.

गीताताईंची गाजलेली गीते
निता देवकुळे यांची लेखणीचे राजे अण्णाभाऊ माझे साहित्यात नाव शोभले अण्णाभाऊ या दुनियेत गाजले,
२ असा आहे विद्वान सांग शोधून रं बाळा,
३)शाहिरा शाहिरा घे मानाचा मुजरा,
४)वालू आई सांगते अण्णाभाऊस फकिराने ओटी भरली तवा तु जगलास,
५) रशियात जाऊनिया ज्याने लाविला तुरा,
६)बाळ मातंगाचा आलाय जन्माला,
७) जग हलवले हलवले मांगाच्या पोराने

हेही वाचा -पळा..पळा.. शेतकरी येत आहेत! उत्तरप्रदेशमध्ये संयुक्त किसान मोर्चा आणि भाजपामध्ये रंगले पोस्टर वॉर

ABOUT THE AUTHOR

...view details