सोलापूर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Park chowk solapur Ambedkar jayanti ) यांच्या 131 व्या जयंती निमित्त सोलापुरात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समता सैनिक दलांनी ( Samata Sainik Dal solapur ) सलामी देत अभिवादन केले. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी देखील डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सर्वधर्म समभाव याचा नारा देत सर्व जाती धर्मांतील मराठा, मुस्लीम आदी समाजातील मान्यवरांनी देखील एकतेचा नारा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंती उत्सवात सहभाग घेतला होता.
हेही वाचा -Raj Thackeray : सोलापुरातील मुस्लिम मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यास दिला पाठिंबा
समता सैनिक दलाकडून सलामी -समता सैनिक दलाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 27 सप्टेंबर 1924 साली केली होती. ग्रामीण भागातील दलित बांधवांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढवण्यासाठी बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत ही संघटना कार्यरत आहे. सोलापुरातील समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना सलामी देण्यात आली.