सोलापूर -महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक मंगळवारी (दि.15 जून) संपन्न झाली. या बैठकीत हद्दवाढ भागातील मिळकतदारांचा विषय घेण्यात आला होता. सर्व नगरसेवकांच्या संमतीने हद्दवाढ भागातील घरांना नियमित करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे लाखोंच्या संख्येने राहत असलेल्या हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी खूशखबर सोलापूर महानगरपालिकेने दिली. 1992 साली सोलापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करून आजूबाजूला असलेल्या गावठाण भागाला शहर हद्दीत समाविष्ट करून घेतले होते. मात्र, येथील घरे आजतागायत शहर हद्दीत किंवा सिटी सर्व्हेमध्ये समाविष्ट झालेली नव्हती. आज झालेल्या सर्वसाधारण बैठकीत हद्दवाढ भागातील सर्व मिळकती शहर हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हद्दवाढ भागातील सर्व घरे नियमित होऊन सिटी सर्व्हेत नोंद होणार
सोलापूर शहराच्या आजूबाजूला असलेली अनेक छोटीमोठी गावठाण भाग किंवा गावे शहर हद्दीत 1992 साली समाविष्ट करण्यात आली होती. पण, येथील घरांची नोंद मात्र गावठाण भागातच नोंद होती. अनेक घरे नोटरी खरेदीवर सोलापूर महानगरपालिकेत नोंदणी केली जात होती. यामुळे या घरांना अधिक वाव नव्हता आणि यांच्या किमतीही स्थिर होत्या. हद्दवाढ भागातील नागरिक दरवर्षी आपल्या मिळकतीचे कर मात्र महानगरपालिकेला भरत आहेत. पण, या हद्दवाढ भागातील मिळकती आजपर्यंत गावठाण भागात गणली जात होती. आज पालिकेत झालेल्या सर्वसाधारण बैठकीत या मिळकती नियमित करून सिटी सर्व्हेमध्ये नोंद करण्याची मंजुरी मिळाली आहे.
हद्दवाढ भाग सरसकट सर्व मिळकती किंवा घरे नियमित होणार