महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

साखर कारखान्याच्या चिमणीचा बाऊ केला: धर्मराज काडादि

विमान सेवेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा करत असल्याचे एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाने सांगितले. याबाबत त्यांनी अहवाल दिला होता. परंतु त्या अवहालाचा अधिक अभ्यास केल्यानंतर यामध्ये आणखी अडथळे असल्याचे समोर आले आहे. साखर कारखान्याच्या चिमणीचा बाऊ केला जात आहे, असे धर्मराज काडादि यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

By

Published : Dec 29, 2020, 5:51 PM IST

सिद्धेश्वर साखर कारखाना चिमणी
साखर कारखान्याच्या चिमणीचा बाऊ केला: धर्मराज काडादि

सोलापूर - शहराच्या विकासात दैनंदिन विमान सेवेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. या विमान सेवेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा करत असल्याचे एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाने सांगितले. याबाबत त्यांनी अहवाल दिला होता. परंतु त्या अवहालाचा अधिक अभ्यास केल्यानंतर यामध्ये आणखी अडथळे असल्याचे समोर आले आहे. त्याचा देखील उहापोह करणे गरजेचे असून उगाच साखर कारखान्याच्या चिमणीचा बाऊ केला जात आहे, असे धर्मराज काडादि यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंगळवारी सकाळी सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्मार्ट सिटीला अडथळा ठरणाऱ्या चिमणीबद्दल त्यांनी माहिती दिली.

साखर कारखान्याच्या चिमणीचा बाऊ केला: धर्मराज काडादि

एनटीपीसीच्या चिमणीचा देखील अडथळा

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या अहवालात फक्त सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत नसून, एनटीपीसीच्या चिमणीचा देखील अडथळा येत आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या तारांचा देखील अडथळा आहे, असे काडादि म्हणाले. यापूर्वी किंगफिशर एअर लाईनच्या विमान सेवेत चिमणी का अडथळा ठरली नाही, मात्र आता आरोप करण्यात येत आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणीचा बाऊ करून सहकारी क्षेत्रातील मुख्य साखर कारखान्याची बदनामी सुरू आहे.

सोलापूरच्या विकासाविरोधात सहकारी साखर कारखाना आला नाही

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1971 साली झाली. आणि होटगी रोड येथील विमानतळाची स्थापना 1986 साली झाली आहे. उलट या साखर कारखान्यामुळे अनेकांना रोजगार मिळाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासात या साखर कारखान्याने हातभार लावला आहे. तर सोलापूरच्या विकासात अडथळा कसा होतो. असा सवाल देखील साखर कारखानदारांच्या प्रशासनाच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

चिमणी पाडण्याची निविदा दोन वर्षापासून प्रलंबित

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने चिमणी पाडण्याची निविदा काढली आहे. 2017 पासून ही निविदा प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने देखील चिमणी पाडण्याचा आदेश दिला आहे. तरी देखील निविदा पडूनच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details