महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Solapur Bike Thief ..... म्हणून मी दुचाकी चोरीचा धंदा सुरू केला; ऐकून पोलिसदेखील गेले चक्रावून

मार्केट यार्डात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ Bike Theft Solapur Market Yard घातला होता. सोलापूर क्राईम ब्रँचच्या Solapur Crime branch arrested bike thief पोलिसांनी बारीक-सारीक माहिती घेत एका संशयित चोरट्याचा तपास लावला. कसून तपास करत एकूण तिघा संशयितांना ताब्यात घेतले व तब्बल 29 मोटारसायकली हस्तगत केल्या 29 motorcycles seized by Solapur Police.

म्हणून मी दुचाकी चोरीचा धंदा सुरू केला; ऐकून पोलिसांनी स्वत:चे डोके पिटले
म्हणून मी दुचाकी चोरीचा धंदा सुरू केला; ऐकून पोलिसांनी स्वत:चे डोके पिटले

By

Published : Sep 4, 2022, 5:32 PM IST

Updated : Sep 4, 2022, 6:01 PM IST

सोलापूर :मार्केट यार्डात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ Bike Theft Solapur Market Yard घातला होता. सोलापूर क्राईम ब्रँचच्या Solapur Crime branch arrested bike thief पोलिसांनी बारीक-सारीक माहिती घेत एका संशयित चोरट्याचा तपास लावला. कसून तपास करत एकूण तिघा संशयितांना ताब्यात घेतले व तब्बल 29 मोटारसायकली हस्तगत केल्या 29 motorcycles seized by Solapur Police. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 लाख 45 हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व दुचाकी वाहने मार्केट यार्डात येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांच्या असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या प्रथम संशयिताची अधिक माहिती घेत असताना त्याने पोलिसांना सांगितले, मार्केट यार्डातून त्याची दुचाकी चोरीला गेली होती. म्हणून त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत तब्बल 29 वाहने चोरी केली. Solapur police arrested bike thief from market yard

चोरट्याने मार्केट यार्डला टार्गेट केले होते-संशयित तिघां चोरट्यांनी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मार्केट यार्डला लक्ष केले होते. त्याचा तपास लावून मार्केट यार्डातून चोरी गेलेली दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत. यामध्ये पोलिसांनी मचिंद्र भागवत जाडकर (वय 36 वर्ष ,रा. सिंदवाडा ता मोडनिंब, जि. सोलापूर), सचिन जालिंदर चव्हाण (वय 36 वर्षे, खडकपूर चौक, ता. मोडनिंब, जि. सोलापूर), दत्तात्र्यय रावसाहेब शेळके (वय 25 वर्षे, मौजे अरण, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने दुकाची चोरीच्या घटनेविषयी माहिती देताना


चोरट्याने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती-दुचाकी वाहने चोरणाऱ्या टोळीचा छडा लावताना गुन्हे शाखेचे एपीआय दादासो मोरे यांना एका खबऱ्याने माहिती दिली की, जुना बोरामणी नाक्याजवळ मचिंद्र भागवत जाडकर हा चोरीची दुचाकी घेऊन विक्रीसाठी येणार आहे. पोलिसांनी संशयिताला सापळा लावून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला अधिक विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तो मार्केट यार्डातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे दुचाकी वाहन सोलापूर मार्केट यार्डातून चोरीला गेले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी दोन साथीदारांना घेऊन चोरीचा गोरखधंदा सुरू केला असल्याची माहिती दिली.


मालवाहतूक वाहनात कोंबायचे चोरीच्या बाईक अन्‌ व्हायचे पसार-सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी संशयित चोरटे दुचाकी वाहने लंपास करत होते- सोलापूर मार्केट यार्डात पाहाटेच्या सुमारास येणारे शेतकरी व व्यापारी घाईगडबडीत वाहने पार्क करत होते. ज्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर नाही ,अशा ठिकाणी मास्टर चावीचा आधार घेत दुचाकी वाहने पहाटेच्या सुमारास लंपास करत होते. संशयीत आरोपी हा फळभाज्याच्या मालवाहतूक वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आपल्या दोन साथीदारांसह मार्केट यार्डात येत होता. पहाटेच्या सुमारास येऊन फळभाज्या रिकामे करून ती वाहने मालवाहतूक वाहनांत घेऊन जात होते.


ज्या वाहनांना अधिक मागणी तीच वाहने चोरली-सद्यस्थितीत होंडा कंपनीच्या आणि अधिक अवरेज असणाऱ्या वाहनांना अधिक मागणी आहे. यामध्ये स्प्लेंडर, एचएफडीलक्स याला अधिक मागणी आहे.म्हणून फक्त हीच वाहने चोरी करून माढा, टेम्भुर्णी परिसरात मिळेल त्या किमतीत विकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्राईम ब्रँचच्या पथकाने जवळपास 29 वाहने हस्तगत केली आहे. ही कारवाई करताना पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, एपीआय मोरे, संदीप जावळे, विनोद राजपूत, इम्रान जमादार यांनी केली. राहुल तोगे, श्रीकांत पवार, इब्राहिम शेख आदींनी महत्त्वाची कामगिरी बजावली. सध्या तिन्ही संशयित चोरटे पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांनी दिली.

Last Updated : Sep 4, 2022, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details