सोलापूर -दिल्ली येथील आम आदमी पार्टीच्या राज्य सरकारने लॉकडाऊन न लावता वेगवेगळ्या उपाययोजना राबवत कोविड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवले आहे. सोलापूरच्या स्थानिक प्रशासनाने देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दिल्ली पॅटर्न राबवावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच लॉकडाऊन लावणे हा मूर्खपणा असल्याचे मत आपच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
काय आहे दिल्ली पॅटर्न-
लॉकडाऊन लावणे हा कोविड 19 चा मुळीच इलाज नाही. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी मार्च 2020 पासून जवळपास तबल दोन ते अडीच महिने लॉकडाऊन लागू केले होते. तरी देखील रुग्णसंख्या वाढत गेली. शेवटी दिल्ली येथील राज्य सरकारने लॉकडाऊन न लावता वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या. आप सरकारने दिल्लीमध्ये नागरिकांना मास्क, साबण, सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. मोफत लसीकरण केले. हा कोविड -19 चा मूळ उपचार आहे. दिल्लीतील लोकसंख्या आणि लोकसंख्या घनता सोलापूरपेक्षा अधिक आहे. हा दिल्ली पॅटर्न सोलापुरातील स्थानिक प्रशासनाने राबवावा, अशी मागणी करत लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आणि तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
सोलापुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दिल्ली पॅटर्न राबवा: आपची मागणी - सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन
आप सरकारने दिल्लीमध्ये नागरिकांना मास्क, साबण, सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. मोफत लसीकरण केले. हा कोविड -19 चा मूळ उपचार आहे. दिल्लीतील लोकसंख्या आणि लोकसंख्या घनता सोलापूरपेक्षा अधिक आहे. हा दिल्ली पॅटर्न सोलापुरातील स्थानिक प्रशासनाने राबवावा, अशी मागणी करत लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आणि तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आप