सोलापूर- इंदापूर व बारामतीला पाणी नेण्याच्या निर्णयाचा निषेध करत घागरी वाजवत तसेच पालकमंत्र्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंकू मिश्रित पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. दिवसेंदिवस सोलापुरात उजनी पाण्याचा प्रश्न पेटत चालला आहे. सर्व पक्ष स्तरावरून विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय भरणे ( Guardian Minister Dattatray Bharne ) यांचा विरोध वाढतच आहे. आम आदमी पक्षाच्या वतीनेही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घागरी वाजवून आणि कुंकूने जलाभिषेक करत निषेध करण्यात आला.
सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत करा मग देशभर वाटप करा -आम आदमी पक्षाचे पदाधीकारी म्हणाले, सोलापूरचा पाणी प्रश्न गंभीर असतानाही याचा विचार न करता लिंबोळी लाकडी योजना मंजूर करून उजनी जलाशयातील पाणी इंदापूर, बारामती (जि. पुणे) येथील ग्रामीण भागात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी सोलापूरला दररोज पिण्याचा पाणी पुरवा त्यानंतर देशभर कुठेही पाणी न्या, असे मत व्यक्त केले.