सोलापूर - कोरोना महामारी सुरू झाली आणि लॉकडाऊन सुरू झाले. कोरोना विषाणूने संपूर्ण जग थांबवले. पण सोनू सूद न थकता अखंडपणे लोकांच्या मदतीसाठी धडपड करत आहे. सोनूला भेटण्यासाठी त्याचा एक चाहता तेलंगणाहून मुंबईकडे पायी निघाला आहे. हा चाहता आज सोलापुरात आला. व्यंकटेश हरिजन, असे त्याचे नाव आहे.
हेही वाचा -सोलापूरमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दुसऱ्या लसीकरणाचे आयोजन
व्यंकटेश हा तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातून पायी आला आहे. तो मुंबईकडे जाणार असल्याची माहिती त्याने दिली. व्यंकटेश हा विकाराबाद जिल्ह्यातील दोरनालपल्ली गावचा रहिवासी आहे. इंटरमीडिएटच्या दुसऱ्या वर्गात शिकणारा २० वर्षीय व्यंकटेश आज दुपारी सोलापूर शहरात पोहचला. शहरात ठिकठिकाणी त्याचे स्वागत करण्यात आले. व्यंकटेश सोनू सूदच्या कोरोना काळतील समाजसेवेने प्रभावित झाला आहे. त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवतात, तर आईचे निधन झाले. मदत मागण्यासाठी तो हातात अभिनेता सोनू सूदचा भलामोठा फोटो घेऊन तेलंगणाहून मुंबईकडे चक्क पायी निघाला आहे.
व्यंकटेश 800 किमी प्रवास चालत करणार आहे