सोलापूर - कोरोनाने मृत्यू झालेल्या एका ५९ वर्षीय वृध्द महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नात्यातील कोणीही आले नाही. अशा परिस्थितीत एका तरूणाने त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले. ही घटना माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरात घडली. कुर्डूवाडीतील रेल्वे कॉलनीत अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या ५९ वर्षीय निराधार वृद्धेचा कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. जितेंद्र युवराज गायकवाड या तरुणाने पुढाकार घेऊन त्यांच्यावर अत्यसंस्कार केले. जितेंद्रला डेव्हिड नावाच्या तरुणाने देखील मदत केली.
59वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचार घेत असताना त्याचे नातेवाईक त्यांना एकदाही पाहण्यासाठी आले नाहीत. उपचार घेत असताना १९ एप्रिलला दुपारी १ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मात्र, जवळचे नातेवाईक आले नसल्याने त्यांच्यावर अत्यसंस्कार कसा करायचा, हा प्रश्न उपस्थित झाला. याची माहिती कुर्डूवाडीकर हेल्पलाईनच्या माध्यमातून काम सामाजिक कार्य करणाऱ्या जितेंद्र गायकवाड यांना मिळाली. जितेंद्र यांनी स्वत: पीपीई किट घालुन या वृध्द महिलेचे पार्थिव पॅक करून खिश्चन धर्माच्या रीतीनुसार त्यावर अत्यंसंस्कार केले.
शहरावासियांसाठी सुरू केली हेल्पलाईन -
जितेंद्र गायकवाड हा तरुण कुर्डूवाडीमधील रहिवासी आहे. त्याने "हाक तुमची साथ आमची, आम्ही कुर्डूवाडीकर आपल्या मदतीस चालु" या हेल्प लाइनच्या माध्यमातून जितेंद्रने अनेकांना मदत केली आहे. रुग्णवाहिकेसह अन्य अडचणींसाठी - 8600698799 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याने केले आहे.
अनेक महिन्यांपासून या वृध्द आजी रेल्वे कॉलनीत वास्तव्यास होत्या. कोरोनाबाधित असताना त्यांचा मृत झाल्याने त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. ही घटना समजताच मी पीपीई किट घालून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मी याला माझी बांधिलकी आणि कर्तव्य समजतो. यापुढे ही कोरोना काळात याच उत्साहाने काम सुरु राहील, असे जितेंद्र म्हणाला.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या