महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरात माकपकडून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - सोलापूर भाजप बातमी

सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माकपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी अमित शाह, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना माकप कार्यकर्ते
प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना माकप कार्यकर्ते

By

Published : Sep 15, 2020, 4:23 PM IST

Updated : Sep 15, 2020, 4:47 PM IST

सोलापूर- शहरात मंगळवारी (दि. 15 सप्टें.) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

सोलापुरात माकपकडून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

दिल्ली हिंसाचारात डाव्या विचारसरणीच्या अनेक नेत्यांना गुंतवण्यात आले आहे. त्यांच्यावर सरकारने अनेक आरोपाचा ठपका ठेवला आहे. याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

दिल्लीतील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्यासाठी हेतुपुरस्सर पूर्वनियोजित कट कारस्थान करून दंगल घडविण्यात आली होती. याला केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे. देशातील लोकशाहीवादी, पुरोगामी विचारवंत, साहित्यिक, कलावंत, विद्यार्थी, राजकीय पक्षाचे नेते यांना लक्ष्य करून त्यांच्यावर खोटे आरोप लावून दोषारोप पत्र दाखल करण्यात येत आहे, असे आरोप करत माकपच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी अमित शाह मुर्दाबाद, दिल्ली पोलीस होश मे आवो, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणले होते. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

यावेळी नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख, म. हनीफ सताखेड, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, सलीम पटेल, माशाप्पा विटे, मुरलीधर सुंचू, अनिल वासम, अशोक बल्ला, दाउद शेख, नरेश दुगाणे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, विल्यम ससाणे, बापू साबळे, दत्ता चव्हाण, अकिल शेख, बापू कोकणे, जावेद सगरी, विक्रम कलबुर्गी, वसिम मुल्ला, हसन शेख, रफिक काझी, दीपक निकंबे, अप्पाशा चांगले, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याल, श्रीनिवास गड्डम, मोहन कोक्कुल, बालाजी गुंडे, मल्लेशम कारमपुरी, शाम आडम, दिनेश बडगु, मल्लिकार्जुन बेलीयार, अंबादास बिंगी, रवी गेंट्याल, बजरंग गायकवाड, इब्राहीम मुल्ला, आरिफ मणियार, किशोर गुंडला, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकांरी या आंदोलनात सहभागी होते.

हेही वाचा -...म्हणून संतापलेल्या नगरसेवकांनी पळवली महापालिका आयुक्तांची खुर्ची

Last Updated : Sep 15, 2020, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details