सोलापूर पारशी झोरोस्ट्रीयन Zoroastrian समाज Parsi Community पतेती हा दिवस क्षमा पश्चाताप म्हणून साजरा करतात. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी पतेती सण Pateti Festival पारशी समाजाकडून Parsi Community अग्नी देवतेसमोर God of Fire माफी मागून साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट रोजी नववर्ष साजरा केले जाते. याला नवरोझ Nowruz असेही म्हटले जाते. पतेतीला पश्चाताप करीत आपल्या सर्व पापांबद्दल अग्नी देवतेसमोर माफी मागितली जाते. पतेतीला पारशी समाजातील लोकं त्यांच्या चुका वाईट गोष्टींबाबत क्षमा मागतात आणि दुसऱ्या दिवसापासून नवी सुरुवात करतात. सोलापुरातदेखील जेमतेम लोकसंख्या असलेल्या पारशी समुदायातील लोक पतेती व नवरोज साजरा करीत आहे.
पारशी लोकसंख्या वाढविण्यासाठी जियो पारशी योजनाभारत देशातील पारशी लोकसंख्या घटत असल्यामुळे केंद्र सरकारने नोव्हेंबर 2013 साली जिओ पारशी योजना आणली. सोलापुरातससुद्धा पारशी समुदायाची लोकसंख्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. आजदेखील पारशी समुदायातील लोकसंख्या घटतच चालली आहे. पारशी समुदायात जास्तीत जास्त मुले बाळे जन्माला यावे यासाठी ही योजना आहे. या योजनेनुसार 2013 पासून आजतागायत पारशी समाजात फक्त 359 बाळांचा जन्म झाला आहे. 2014 मध्ये 16 बाळ जन्माला आले. 2015 साली 38 बाळ जन्मले 2016 मध्ये 28 बाळ जन्माला आले 2018 मध्ये 38, 2019 मध्ये 59 आणि 2020 मध्ये 61 बाळ जन्माला आले.
सोलापुरात शंभरहून कमी पारशीसोलापूर शहर आणि जिल्ह्यात शंभरहून कमी पारशी असल्याची माहिती पुजारी विष्टाष्प मुंशी यांनी दिली. सोलापूर शहरातील लष्कर या भागात पारशी सामुदायाचे अग्यार (मंदिर) आहे. हे मंदिर 1844 मध्ये ब्रिटिश काळी स्थापन झाले आहे. पारशी अंजुमन या संस्थेमार्फत या मंदिराची देखभाल केली जाते. शहरात शंभरहून कमी लोकसंख्या असल्याची माहिती यावेळी दिली. झरीन अमरिया झुबिन अमरिया फरीज दारुखनावला बेहराम इरानी मोनाज पेठावाला अनहिता लाल हे अग्यारी मंदिराचे सांभाळ करीत आहेत. सोलापुरातील अग्यारी मंदिराचे पुजारी त्यांचे वय जवळपास 120 वर्षे आहे. तेदेखील अद्याप अविवाहित आहेत. त्यांचे बंधू 150 वय असताना निधन झाले. तेदेखील अविवाहित होते. पारशी समाजात मुली नसल्याने लग्न करणे अवघड झाले आहे असेही यावेळी विष्टाष्प मुंशी म्हणाले.