सोलापुर -मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा व सकल मराठा समाज यांची रविवारी (दि. 18 सप्टेंबर)रोजी दुपारी शिवाजी प्रशालेत संयुक्त आरक्षण परिषद झाली. ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका जशा घेतल्या गेल्या नाहीत त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शासनाची कोणतीही मेगा नोकर भरती होऊ देणार नाही, असा इशारा सोलापुरातील मराठा आरक्षण परिषदेनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सरकारला दिला आहे. मराठा समाजातील छुप्या असंतोषाचा कधीही उद्रेक होऊ शकतो त्यामुळे समाजाचा अंत न पाहता 30 दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्यावा असा अल्टिमेट देखील यावेळी राज्य शासनाला देण्यात आला आहे.
सोलापुरात झालेल्या राज्यव्यापी आरक्षण परिषदेत ठराव -मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षण परिषद सोलापुरात झाली. या आरक्षण परिषदेत राज्यातील अनेक अभ्यास तज्ञांनी येऊन आपली मते व्यक्त केली.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर खापर फोडत राज्य शासनाला 30 दिवसांचा अल्टिमेट देण्यात आला आहे.आता मराठा समाज निवेदन घेऊन जाणार नाही.सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही. मोर्चे कसे काढायचे हे मराठा समाजाला सांगायची गरज नाही. येत्या तीस दिवसात मराठा समाजाला घटनात्मक व कायदेशीर आरक्षण मिळावे .अशी आग्रही मागणी मराठा समाज आरक्षण समितीचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केली.