पुणे :सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर ( Shrikant Deshmukh ) पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात ( Deccan Police Station ) त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवांपूर्वीच श्रीकांत देशमुख यांच्यासह एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची चर्चा सोलापूरमध्ये चांगलीच रंगली होती. सदरील महिलेने देशमुख यांनी फसवणुक केल्याचे म्हटले होते. हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांच्या अवतीभवती असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे.
Shrikant Deshmukh : भाजप सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल - डेक्कन पोलिस ठाणे
सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ( Shrikant Deshmukh ) यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात ( Deccan Police Station ) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
श्रीकांत देशमुख यांच्यावर डेक्कन पोलिसात गुन्हा
दरम्यान, श्रीकांत देशमुख यांचा एका महिले सोबतची कथित संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनतर आज या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Last Updated : Jul 18, 2022, 7:24 PM IST