महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात; मागील 4 दिवसांत सरासरी 50 मिमी पावसाची नोंद

शहर व जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यातील जवळपास सर्व भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात मागील 4 दिवसांत 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

monsoon in solapur
शहर व जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे.

By

Published : Jun 16, 2020, 7:50 PM IST

सोलापूर - शहर व जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यातील जवळपास सर्व भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात मागील 4 दिवसांत 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील कामांना वेग आलाय. आज दिवसभर शहर परिसरात दमदार पाऊस झाला आहे.

शहर व जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील 91 महसुली मंडळात पाऊस पडत असल्याने मागील तीन दिवसांत समाधानकारकर पाऊस झाला आहे. राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हमावान खात्याने वर्तवला होता. तसेच ११ जूनपासून राज्यातील सर्व भागांमध्ये मान्सून सक्रिय होणार होता. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात देखील पावसाची सुरुवात झाली आहे. यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस बरसणार असल्याचा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. पहिल्याच टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शहरात सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत काही वेळ पावसाचा जोर ओसरला. मात्र यानंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details