सोलापूर - जीवनावश्यक खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी लागू ( 5 percent GST on essential goods ) करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. याचा विरोध आजदेशभरामध्ये वेगवेगळ्या व्यापारी संघटना करताना दिसून येत आहेत. सोलापुरातल्या भुसार अडत व्यापारी संघाने देखील आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला ( Strike in Solapur ) आहे. त्यामुळे सोलापुरातल्या मार्केट यार्ड परिसरातील किराणा साहित्याची दुकाने आज सकाळपासून बंद आहेत. आधीच महागाई असताना जीएसटीचा बोजा सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही अशी भूमिका व्यापारी संघटनांची आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध सोलापुरातील भुसार अडत व्यापारी करत आहेत. ( strike of Bhusar traders in Solapur )
जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी - केंद्र सरकारने जीवनावश्यक अन्नधान्य, गहू, तांदूळ, डाळी, गूळ व इतर खाद्याने वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू केली आहे.या कायद्याच्या प्रखर विरोधात भारतीय उद्योग व्यापार मंडळ (नवी दिल्ली), पुणे मर्चंट चेंबर, कॅमेट, फाम या वरिष्ठ शिखर संघटनेच्या आदेशानुसार शनिवार १६ जुलै रोजी सोलापुरातील भाजीपाला मार्केट वगळता मार्केट यार्डातील भुसार विभाग व शहरातील किराणा मार्केट यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला आहे.