महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Solapur Mass Copy Case: सोलापूरात सामुहिक कॉपी प्रकरणी इंजिनिअरिंगचे 319 विद्यार्थी एक वर्षासाठी डीबार - प्रहार जनहित शेतकरी संघटना

Solapur Mass Copy Case सोलापूरात एमएसबीटी अंतर्गत पॉलिटेक्निकल शाखेच्या होणाऱ्या परीक्षा मौलाना आझाद संस्थेतील ( Maulana Azad Institute Solapur ) 319 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी ( Mass copying case ) केली म्हणून डीबार केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याच्या सूचना एमएसबीटीने मौलाना आझाद संस्थेला दिली आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे पवित्रा घेतला आहे.

319 Engineering Students
सामुहिक कॉपी प्रकरणी इंजिनिअरिंगचे 319 विद्यार्थी एक वर्षासाठी डीबार

By

Published : Sep 14, 2022, 11:21 AM IST

Updated : Sep 14, 2022, 11:41 AM IST

सोलापूर -Solapur Mass Copy Case शहरातील एका खाजगी इंजिनिअरिंग डिप्लोमा महाविद्यालयातील 319 विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी प्रकारणी एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. जून ते जुलै दरम्यान इंजिनिअरिंगच्या प्रथम ते तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ऑगस्ट महिन्यात निकाल येण्या अगोदर एमएसबीटीई मंडळाकडून 319 विद्यार्थ्यांना निलंबित ( 319 students suspended ) केल्याचे पत्र प्राप्त झाले. महाविद्यालय प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करून माहिती घेतली असता, सामूहिक कॉपी केल्याने एक वर्षासाठी विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूरात सामुहिक कॉपी प्रकरणी इंजिनिअरिंगचे 319 विद्यार्थी एक वर्षासाठी डीबार

सर्वच शाखांमधील विद्यार्थ्यांवर कारवाई -सोलापूर शहरातील मौलाना आझाद डिप्लोमा महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.जून 2022 दरम्यान सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आदी शाखामधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या. एकूण 596 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या. ऑगस्ट 2022 ला निकाल येण्या अगोदर 396 विद्यार्थ्यांवर सामूहिक कॉपीची कारवाई झाली असल्याचे एमएसबीटीईकडून पत्र कॉलेज प्रशासनास प्राप्त झाले. यामुळे विद्यार्थी व पालकांत एकच खळबळ उडाली आहे. सर्वच विद्यार्थी व पालक मंगळवारी 13 सप्टेंबररोजी दिवसभर महाविद्यालयासमोर थांबून होते.

विद्यार्थ्यांना घेऊन एमएसबीटीईच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणार -प्रहार जनहित शेतकरी संघटनेच्या ( Prahar Janhit Farmers Association ) पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू घेत मौलाना आझाद कॉलेज मधील प्राचार्य व चेअरमन यांना जाब विचारला. पण कॉलेज प्रशासनाने याबाबत एमएसबीटीईने कारवाई केली असल्याची माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थी व पालकांसोबत बैठक घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई कॉलेज प्रशासनाने केली नसून परीक्षे नंतर उत्तरपत्रिकामधील सर्व विद्यार्थ्यांचे उत्तरे सारखे आहेत. त्यामुळे मुंबई येथील एमएसबीटी कार्यालयाकडून कारवाई झाली आहे. आम्ही देखील विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी, खालिद मणियार, जमीर शेख ( Zameer Sheikh )यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबई येथे जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घालणार आहेत.


Last Updated : Sep 14, 2022, 11:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details