सोलापूर -पोटच्या सोळा महिन्यांच्या बाळावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या बापाला व तिच्या आईला सोलापूर जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. 3 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. आपल्या बाळाचा खून करून सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसने जाताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला होता. फास्ट ट्रॅक न्यायालयाने साक्ष, वैद्यकीय पुरावे या आधारे धोलराम अर्जुनराम बिष्णोई (वय 26), पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (वय 20 वर्ष,) दोघे रा. राजस्थान या दोघांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली ( girl abusing and murder case parents sentenced death solapur ) आहे.
ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून - आरोपी धोलाराम व पुनीकुमारी बिष्णोई हे कामानिमित्त राजस्थानहून हैद्राबाद येथे गेले होते. 3 जानेवारी मयत सोळा महिन्याच्या बाळावर धोलाराम बिष्णोई याने आपल्या बाळाला दारू पाजली. तिच्यावर अनैसर्गिक, नैसर्गिक व मौखिक अत्याचार केला. अत्याचार केल्याने बाळ सतत रडत होते. तिचा आवाज बंद करण्यासाठी ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केला. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पती पत्नी हैद्राबाद हुन सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसने आपल्या मूळ गावी निघाले होते.
प्रवाशांना संशय आल्याने पोलिसांना कल्पना दिली -धोलाराम बिष्णोई व पुनीकुमारी बिष्णोई हे दोघे सोळा वर्षाच्या बाळाचे मृतदेह घेऊन रेल्वेने हैदराबादहुन निघाले होते. पण, हैदराबादहुन बाळ रडत नाही, हालचाल करत नाही याबाबत संशय आल्याने सहप्रवाशांनी ताबडतोब रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच सोलापूर रेल्वे स्थानकावर 4 जानेवारी 2022 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. बाळाची तपासणी केली असता सोळा महिन्यांचे बाळ मयत झाले असल्याचे निदर्शनास आले. त्याचे शवविच्छेदन केले असता त्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले असल्याचं डॉक्टरांनी अहवाल दिला. यानुसार धोलाराम बिष्णोई व त्याच्या या कृत्यात सहकार्य केल्याबद्दल पुनीकुमारी बिष्णोई यावर खून, लैंगिक अत्याचार (बलात्कार), पॉस्को अंतर्गत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.