सोलापूर -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022 ) जयंतीनिमित्त सोलापुरात आज (गुरुवारी) दिवसभर एका रुपयात एक लीटर पेट्रोल ( One liter petrol for one rupee Solapur ) वाटप करण्यात आले आहे. पेट्रोल 1 रुपयांत मिळत असल्याने पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांची तुफान गर्दी उसळली उसळल्याचे पाहायला मिळाले. ही गर्दी नियंत्रनात आणण्यासाठी पेट्रोल पंप चालकाने पोलीस बंदोबस्त मागविला होता. मोदी सरकार किंवा केंद्र सरकारमुळे पेट्रोलचे दर ( central government has increased petrol prices ) गगनाला भिडले आहेत. मोदी सरकारला संदेश देण्यासाठी 1 रुपयांत पेट्रोल उपलब्ध करून दिले आहे, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली आहे.
'केंद्र सरकारला संदेश देण्यासाठी 1 रुपयांत पेट्रोल' :एकीकडे दिवसेंदिवस महागाईचा सामान्य जनतेला फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सोलापुरातील नागरिकांना पेट्रोल 1 रुपये लीटर मिळत असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कम्बरडे मोडले आहे. पेट्रोलच्या दरवाढीचा परिणाम प्रत्येक नागरिकाला भोगावा लागत आहे. त्यामुळे पेट्रोल 1 रुपयांत उपलब्ध करून केंद्र सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती राहुल सर्वगोड यांनी दिली आहे.