सांगली - गेल्या ५ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे. आता देश महासत्ता बनवण्यासाठी या निवडणुकीच्या निमित्ताने एक जनआंदोलन सुरू झाले आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य व व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगली येथे आयोजित व्यापारी-उद्योजक मेळाव्यात व्यक्त केले.
नरेंद्र मोदींमुळे ५ वर्षात देश आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला - सुरेश प्रभू - सुरेश प्रभू
आर्थिक उत्पन्न दुप्पट झाले. त्याचबरोबर महागाईसुद्धा गेल्या २ वर्षात कमी झाली आहे. त्यामुळे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे, असेही प्रभू म्हणाले.
सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सांगली शहरात भाजपकडून व्यापारी-उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांनी उपस्थितीत लावली होती.
देश ज्यावेळी आर्थिक संकटात होता, त्यावेळी नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता आली. मोदी यांनी शेतकरी, सर्वसामान्य, व्यापारी, कष्टकरी यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक योजना राबवल्या. यामुळे आर्थिक उत्पन्न दुप्पट झाले. त्याचबरोबर महागाईसुद्धा गेल्या २ वर्षात कमी झाली आहे. त्यामुळे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे, असेही प्रभू म्हणाले. याप्रसंगी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, यांच्यासह युतीचे नेते आणि सांगली मिरज येथील व्यापारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने हजर होते.