सांगली- खटाव गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. पाण्याच्या मागणीसाठी मिरजेच्या खटावमधील ग्रामस्थांनी आंदोलन छेडत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
पाणी द्या; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, खटाव ग्रामस्थांचा इशारा - election
पाणी सोडण्याची मागणी करुनसुद्धा केवळ राजकीय आडकाठीमुळे गावाला पाणी मिळत नसल्याचा आरोप खटाव ग्रामस्थांनी केला आहे.
खटाव ग्रामस्थांचे आंदोलन
मिरजेच्या पूर्व भागात असणाऱ्या खटावसह वाड्यावस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाचा तडाखा आणि पाण्याच्या समस्येमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पाणी सोडण्याची मागणी करुनसुद्धा केवळ राजकीय आडकाठीमुळे गावाला पाणी मिळत नसल्याचा आरोप खटाव ग्रामस्थांनी केला आहे.