सांगली - उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ओढलेले ताशेरे म्हणजे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे सर्टिफिकेट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही, त्यामुळे न्यायालयानेच मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे म्हणजे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे सर्टिफिकेट - जयंत पाटील - उच्च न्यायालय
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मुख्यमंत्री आहात का? पक्षाचे नेते, असे न्यायालयाने मुख्यमत्र्यांना विचारले आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मुख्यमंत्री आहात का? पक्षाचे नेते, असे न्यायालयाने मुख्यमत्र्यांना विचारले आहे. गेल्या ५ वर्षांपासून आपण मागणी करत आहोत की स्वतंत्र गृहमंत्री नेमा, मात्र, मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही. पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासावरून न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना खडसावले आहे.
महाराष्ट्राच्या जनतेला हा पुरावा आहे, की मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी सांभाळली, याचे सर्टिफिकेट उच्च न्यायालयाने दिले आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.