पुणे : जिल्हा परिषद शाळा आणि त्या शाळेची स्थिती याबाबत एकीकडे सुधारण्याची चर्चा चालू आहे. तसेच, दुसरीकडे अनेक शिक्षक आपल्या कल्पनेतून देशाचे भवितव्य या जिल्हा परिषद शाळेतून घडवत ( Zilla Parishad School of Gorhe Village Pune ) असतात, अशीच एक जिल्हा परिषदेची शाळा पुणे जिल्ह्यात रणजीत मेंढे सर ( Ranjit Mendhe Sir in Pune District ) यांनी घडवली आहे. जिल्हा परिषदेची एक शाळा पुणे जिल्ह्यात ( Modern Science Lab in Zilla Parishad School ) आहे. ही शाळाकुठल्याही आधुनिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेला पाठीमागे टाकून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शाळेची इमारत, शाळेतील स्वच्छतागृह, शाळेतील परिसर ( Television Broadcast in Z P School ), शाळेतील स्वच्छता, ( Pune Gorhe ZP School ) यावर अधिवेशनात प्रश्न ( Ranjit Mendhe Sir in Z P School ) निर्माण केले जात असताना या शाळेने कुठल्याही सरकारची मदत न घेता एक ( Moon Star Study in Z. P. School ) आदर्श जिल्हा परिषद शाळा ( Special story of Zilla Parishad School ) उभे केलेली आहे.
खडकवासला परिसरातील गोऱ्हे बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळापुण्यातील खडकवासला बॅकवॉटरच्या साईडला एक छोटेसे गोऱ्हे बुद्रुक नावाचे गाव आहे. त्या गावांमध्ये ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेला सातआठ वर्षांपूर्वी शाळेत विद्यार्थी घालावे का नाही, अशी पालकांची अवस्था असताना आता मात्र विद्यार्थी काढण्यासाठी पालक स्वतःहून येत असल्याची परिस्थिती शाळेमध्ये आज आहे.
जिल्हा परिषद शाळेत आधुनिक सायन्स लॅब :जिल्हा परिषद शाळेमध्ये जिथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तिथे आधुनिक शिक्षण कसे भेटणार, हा खरा प्रश्न अनेक पालकांचा असतो. गावच्या शाळेमध्ये आधुनिक सायन्स लॅब उभे केलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी टेलिस्कोप या शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या शाळेमध्ये ग्रहताऱ्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसहित गावकऱ्यांनासुद्धा शिकवला जातो. विद्यार्थी, विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास यासाठी खासगी शाळा, स्वतःच विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही शाळा काम करीत आहे.
शाळेला आधुनिक शाळा करण्याचे संपूर्ण श्रेय मेंढे सरांचे :ही जिल्हा परिषद शाळा तशी प्राथमिकच आहे. ही पहिली ते पाचवीची शाळा आहे. या शाळेमध्ये तुम्हाला आधुनिक अशी वैज्ञानिक लॅब केलेली आहे. रणजित मेंढे सर यांनी हे सगळे साहित्य खरंतर खासगी लोकांकडून गोळा केलेला आहे. या शाळेमध्ये भारतातून अमेरिकेत गेलेले काहीलोक येऊन मदत करतात. शाळेमध्ये आता स्पॅनिश भाषा शिकवली जाते, असे सगळे उपक्रम या शाळेमध्ये सध्या सुरू करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या लोकांची मदत घेतली आणि आज शाळेला जिल्हा परिषदेच्या शाळेला आधुनिक शाळा करण्याचे संपूर्ण श्रेय हे मेंढे सरांचे आहे.
मित्राने प्रयोग शाळेकरिता दिला टेलिस्कोप : एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की, सर चंद्रावर खड्डे असतात. हे आम्हाला मान्य नाही. कारण तुम्ही खोटे बोलता आणि त्यातूनच सरांना कल्पना सुचली की, आपण यांना चंद्रावरील खड्डे दाखवले पाहिजे. त्यांचे एका अमेरिकेच्या मित्राला विचारले आणि त्या मित्राने त्यांना चक्क टेलिस्कोप दिला. गावकऱ्यांसह त्या विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्यांचासुद्धा अभ्यास करून देत आहे.