पुणे - अहमदनगर जिल्ह्यातील एका इसमाने राज्याचे मुख्यमंत्री, विधान परिषदेचे उपसभापती, स्त्री आधार केंद्र, राज्य महिला आयोग त्यांना धमकीचा मेल 25 मे रोजी केला. त्या इसमाने असे नमूद केलं आहे की, विधवांचा सन्मान केला तर त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली ( Rape threat on widow women ) आहे. यावर युवासेना आक्रमक झाली असून अश्या या मनोरुग्ण युवकाला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. आणि या मनोरुग्णाला मानसिक आजाराची गरज असून याच्या मनोपचाराचा सर्व खर्च युवासेना उचलेल अशी माहिती युवासेनेच्या सहसचिव शर्मिला येवले ( Yuvasena Leader Sharmila Yewale ) यांनी दिली आहे.
Yuvasena Pune : 'विधवाबद्दल असभ्य भाषा करणाऱ्याला मानसिक उपचाराची गरज, अन्यथा अश्या मनोवृत्तीला युवतीसेना ठेचणार'
मुख्यमंत्री, विधान परिषदेचे उपसभापती, स्त्री आधार केंद्र, राज्य महिला आयोग त्यांना धमकीचा मेल 25 मे रोजी केला. त्या इसमाने असे नमूद केलं आहे की, विधवांचा सन्मान केला तर त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली ( Rape threat on widow women ) आहे. यावर युवासेना आक्रमक झाली असून अश्या या मनोरुग्ण युवकाला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. आणि या मनोरुग्णाला मानसिक आजाराची गरज असून याच्या मनोपचाराचा सर्व खर्च युवासेना उचलेल अशी माहिती युवासेनेच्या सहसचिव शर्मिला येवले ( Yuvasena Leader Sharmila Yewale ) यांनी दिली आहे.
अन्यथा विकृतीला ठेचायला कमी करणार नाही - "धमकीचा मेल टाईप करणारा व्यक्ती हा मनोरुग्ण आहे. त्याला लवकरात लवकर मानसिक उपचाराची गरज आहे. त्याच्या सगळ्या उपचाराचा खर्च युवा सेना उचलायला तयार आहे. पण जर याला जर लवकरात लवकर ताब्यात घेतल नाही. तर युवतीसेना अश्या या विकृतीला ठेचायला कमी करणार नाही. असा इशारा देखील यावेळी येवले यांनी दिला.
काय आहे नेमके प्रकरण -राज्य सरकारने नुकताच विधवा महिलांचा अपमान होणार नाही. यासाठी पतीच्या निधनानंतर काढून घेण्यात येणारी प्रतीके न काढण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. मात्र, यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विधवा महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.