महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक; सिंहगड रस्त्यावर तरुणाचा खून, पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह - सिंहगड रोड पुणे न्यूज

मृत कृष्णकुमार हा एका बांधकाम साइटवर सेंट्रींगची कामे करत होता. सिंहगड रस्ता परिसरात तो राहण्यासाठी होता. एका तरुणीसोबत तो लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे.

खून
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 2, 2021, 12:41 PM IST

Updated : Jun 2, 2021, 1:43 PM IST

पुणे - सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बांधकाम साइटवर 28 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. डोक्यात वार करून आणि गळा दाबून खून केल्यानंतर अज्ञात आरोपीने त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिला. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णकुमार गुरुचरन प्रसाद (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत मृतदेह


मृत कृष्णकुमार हा एका बांधकाम साइटवर सेंटरची कामे करत होता. सिंहगड रस्ता परिसरात तो राहण्यासाठी होता. एका तरुणीसोबत तो लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास न-हे येथील अभिनव महाविद्यालयाजवळ असणाऱ्या एका बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता.

डोक्यावर वार करून खून


ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार गळा दाबून आणि त्याच्या डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. अज्ञात आरोपीने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Jun 2, 2021, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details