पुणे : पुण्यात एक धक्कादायक खुनाचा प्रकार घडला आहे. पुण्यातील पूना हॉस्पिटलजवळ ( Pune Hospital ) एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. हा तरुण रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार ( Stabbed by Sharp Weapon ) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मयत तरुणाची ओळख पटली असून, बारक्या दोरी ( Dead Youth Barkya Dori ) असे या मयत आरोपीचे नाव आहे. त्याचे पोलिसांकडून सराईत गुन्हेगार म्हणून त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
पूर्ववैमन्यस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती : काल आखाडा पार्टी करण्याचा शेवटचा दिवस होता. पुण्यातील अनेक ठिकाणी या पार्टीचे ( Akhara Party ) आयोजन करण्यात आले होते. मात्र, पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या पूना हॉस्पिटलजवळ एका तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून झाला असून, याचा पोलिस अधिक तपास करीत आहेत. आरोपीने तरुणावर वार करताना तीक्ष्ण हत्यार वापरले असल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय मृतकावर कोयत्याने वार केल्याच्या खूनही दिसत आहेत. या घटनेमुळे पुणे परिसरात खळबळ उडाली आहे.