पुणे : पुण्यातील जांभूळवाडी येथे बांधकाम प्रकल्पात काम करताना वीजेच्या धक्क्याने एका कामागाराचा मृत्यू (Youth Died of Shock) झाल्याची घटना घडली (Youth died of shock in Jambhulwadi) आहे. याप्रकरणी ठेकेदार आणि जागेच्या मालकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Youth Died of Shock : तरुणाचा शॉक लागून मृत्यू ; ठेकेदारासह जागेच्या मालकावर गुन्हा दाखल
पुण्यातील जांभूळवाडी येथे बांधकाम प्रकल्पात काम करताना वीजेच्या धक्क्याने एका कामागाराचा मृत्यू (Youth Died of Shock) झाल्याची घटना घडली (Youth died of shock in Jambhulwadi) आहे.
गुन्हा दाखल -गंग्या काल्या अमगोत (वय ३०, रा. कात्रज, मूळ तेलंगणा) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत कामगाराची पत्नी झुम्माबाई अमगोत (वय २०) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी ठेकेदार आणि जागेच्या मालकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Youth Died of Shock In Pune) आहे.
वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू -ठेकेदार आणि जागेचा मालक यांनी बांधकामाची परवानगी न घेता तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाय न करता काम सुरू ठेवले होते. प्रकल्पाजवळ महावितरणच्या वीजेच्या तारा असताना सुरक्षिततेची कसलीही काळजी घेतली नाही. अमगोत येथे काम करताना त्याला वीजेचा धक्का लागल्याने तो पहिल्या मजल्यावरून कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू (Youth Died in Pune) झाला.