महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खून केल्यानंतर हातपाय बांधून पोत्यात भरलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला - युवकाचा मृतदेह आढळला

अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत दोरीने हात-पाय बांधून त्याचा मृतदेह पोत्यात भरण्यात आला होता. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. भारती विद्यापीठ पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

deathbody
तरुणाचा मृतदेह

By

Published : Sep 29, 2020, 10:56 PM IST

पुणे - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवले ब्रिज येथे आज(मंगळवार) सकाळी हात पाय बांधलेल्या अवस्थेत पोत्यात भरलेला एका तरुणाचा मृतदेह आढळला. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. आज सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नियंत्रण कक्षाला आलेल्या एका कॉलद्वारे नवले ब्रिजजवळ एका पोत्यामध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना पोत्यामध्ये हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. मृत तरुण हा अज्ञात असून, अद्याप त्याची ओळख पटली नाही.

अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत दोरीने हात-पाय बांधून त्याचा मृतदेह पोत्यात भरण्यात आला होता. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. भारती विद्यापीठ पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details