पुणे -आई, बाबा, आजी, आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्रॉब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेत आहे, असा मेसेज करत पुण्यात एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या (youth commits suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अग्निशामन दलाच्या जवानांनी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तलावातून त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे.
नैराश्यातून संपवलं जीवन-
जीवनात आलेल्या नैराश्यातून पुण्यातील अवघ्या २३ वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या घरच्यांना एक मॅसेज देखील लिहून ठेवला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून, शंकर बसवराज कलशेट्टी असे या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी पलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या तरुणाने रात्री उशीरा आपल्या घरच्यांना 'मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्रॉब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेत आहे.' असा मॅसेज करत हे टोकाचे पाऊल उचलले आहे. हा मॅसेज मिळताच त्याच्या कुटुंबाने तत्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शंकरचा शोध घेतला मात्र हाती काहीच लागलं नाही. शेवटी पोलिसांना सकाळी तपास करत असताना भिलारेवाडी तलावाजवळ चप्पल दिसल्याने पोलिसांनी कात्रज अग्निशामन दलाला बोलावण्यात आलं आणि काही वेळातच त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शंकरने आत्महत्या करण्यापूर्वी ब्लेडने आपल्या हाताची नस कापली होती.
काय होता शंकरचा शेवटचा मॅसेज-
माझ्या जीवनात काही समस्या आहेत, आणि त्या मी सोडवू शकत नाही आणि त्या समस्या संपतही नाहीत त्या समस्या वाढतच जात आहेत. मला माझ्या या सर्व समस्या कोणासोबत शेअर करणे सुद्धा अपमानास्पद वाटते. या सर्व समस्या घेउन मी जगूही शकत नाही. काही दिवसांनी या समस्या अजूनही वाढत जाणार, मी सहन करू शकत नाही. अगोदरच खुप त्रास सहन केला आहे. आता अजिबात सहन होत नाही. म्हणून मी माझ्या स्वत: च्या इच्छेने माझे जीवन संपवत आहे. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी कोणाचीही विचारपूस करण्याची गरज नाही. आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला़ पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला, असा मेसेज शंकरने आत्महत्यापूर्वी केला होता.