पुणे- महागड्या रेसर गाड्या चोरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखा १ ने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार रुपयांच्या ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अतिक वाहिद शेख (वय-१९), वाशीम वाहिद (शेख-२१), राजेश दत्तात्रेय भोसले (वय-२०), प्रवीण उत्तम कांबळे (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शेख आडनावाचे आरोपी सख्खे भाऊ आहेत.
मौजमजेसाठी महागड्या दुचाकी चोरणारे महाविद्यालयीन तरुण जेरबंद - दुचाकी चोर पुणे
महागड्या मोटर सायकल चोरून पोबारा होणाऱ्या तरुणांच्या टोळक्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार रुपयांच्या ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गाड्या चोरून महाविद्यालयात घेऊन जात आणि घरी परत येत असताना वेगवेगळ्या सोसायटीमध्ये चोरीच्या गाड्या लावत. सांगवी, येरवडा, लोहगाव येथे बनावट नंबर प्लेटच्या रेसर गाड्या असून त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक लांडगे यांचे पथक हे त्यांच्या मागावर गेले आणि संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महागड्या रेसर, आणि मोपेड दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरच्या दुचाकी या निगडी, दिघी आणि येरवडा येथून चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी हे मौजमजा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी महागड्या गाड्या चोरत असे. दरम्यान, महाविद्यालयातून आल्यानंतर संबंधित दुचाकी या वेगवेगळ्या सोसायटीमध्ये लावत किंवा मित्रांच्या घरी ठेवत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, प्रमोद लांडे, शिवाजी कानडे, मनोजकुमार कमले, विजय मोरे, गणेश सावंत, प्रवीण पाटील, यांनी केली आहे.