महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे : तरुणीवर बलात्कार करून खंडणी उकळली, दोघांना अटक - तरुणी बालात्कार सिद्धार्थ श्रीखंडे अटक

फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीवर बलात्कार करून खंडणी उकळल्याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

abuse
abuse

By

Published : May 23, 2022, 8:34 AM IST

पुणे -फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीवर बलात्कार करून खंडणी उकळल्याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय 22) आणि आशिष विजय कांबळे (वय 23) दोघे रा. थिटे वस्ती, खराडी अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा -Lady Died Due to Electric Shock : इलेक्ट्रिक बाईकची चार्जिंगला लावताना वीजेचा धक्का लागून तरुणीचा मृत्यू

याप्रकरणी खराडी येथील एका 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी परिसरातील डब्ल्युटीसी सेंटर, वाघोलीतील खांदवेनगरमधील कृष्णा लॉज येथे जून 2021 ते 20 मे 2022 दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ हा फिर्यादीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने फिर्यादीला इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मेसेज करून, फिर्यादी यांना मोबाईलवर फोन करून तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिला कारने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान यावेळी फिर्यादीचे नग्न फोटो व व्हिडिओ काढले. ते फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी 17 हजार रुपये उकळले. तसेच, सिद्धार्थचा मित्र आशिष कांबळे याने फिर्यादीला धमकी देऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले.

सतत होणारा अत्याचार आणि पैशांची मागणी याला कंटाळून शेवटी तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय 22) आणि आशिष विजय कांबळे (वय 23) दोघे रा. थिटे वस्ती, खराडी यांना अटक केली.

हेही वाचा -मेव्हण्याने अल्पवयीन मेहुणीला नेले पळवून

ABOUT THE AUTHOR

...view details