पुणे- कर्वेनगरमधील शाहू कॉलनी या ठिकाणी एक तरुणी आणि तिची आई दगड, विटा आणि धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड करत असल्याचे माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्या दोघींना पोलिसांनी चौकशीसाठी कर्वेनगर पोलीस चौकीत नेले. त्या ठिकाणी तरुणीने महिला पोलिसाला शिवीगाळ करत झटापट केली ( Woman Beat Police in Police Station ). ही घटना रविवारी (दि. 2 जानेवारी) दुपारी घडली. या प्रकरणी त्या तरुणीविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Warje Malwadi Police Station ) करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मृणाल किरण पाटील ( वय 21 वर्षे ), सजणा किरण पाटील (वय 45 वर्षे) या दोघीविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.