महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवमतदार तरुणांत उत्साह, मतदान करण्याचा दिला संदेश - मतदान

लोकशाहीच्या वातावरणामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला पाहिजे, असा संदेश यावेळी तरुण मतदारांनी दिला.

शिरुर मतदान

By

Published : Apr 29, 2019, 11:18 AM IST

पुणे- राज्यामध्ये चौथ्या टप्प्याचे आज मतदान होत आहे. आज सकाळी ७ पासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तरुण मतदारांनीही मतदानाला मोठ्य़ा संख्येने मतदानाला हजेरी लावली आहे. काही तरुण-तरुणींनी पहिल्यांदाच मतदान करत मतदानाचा कर्तव्य बजावले आहे.

मतदारांची प्रतिक्रिया

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे मतदान केंद्रावर रांगोळी काढून मतदान केंद्राची फुलांनी सजावट करण्यात आली होती. यावेळी सध्याच्या लोकशाहीच्या वातावरणामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला पाहिजे, असा संदेश यावेळी तरुण मतदारांनी दिला.

शिरुर लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच तरुणाईमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. लोकशाहीमध्ये मतदान हा आपला अधिकार असल्याचे सांगत तरुणाईने पहिल्यांदा मतदान करत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details