महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महागाईच्या काळात माणूसकीचे दर्शन.. पुण्यातील तरुण पोलीस, अपंगांना देतोय मोफत रिक्षा सेवा

रिक्षाचालक धनंजय करे ( Pune autorickshaw Dhananjay Kare ) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस बांधव आणि अपंग व्यक्तींसाठी मोफत रिक्षा सेवा ( Pune autorickshaw driver gave free service ) देत आहे. तसा माहिती देणारे बोर्ड देखील त्याने रिक्षाच्या बाहेर लावला आहे.

Pune autorickshaw Dhananjay Kare
मोफत रिक्षा सेवा धनंजय करे

By

Published : May 15, 2022, 4:39 PM IST

पुणे - कोरोनाचा दोन वर्षांचा काळ हा आपल्या सर्वांसाठी संकटाचा होता. कोरोनामुळे अनेकांना आपल्या जवळची माणसे गमवावी लागली. अनेकांचे संसार या काळात उद्ध्वस्त झाले. आर्थिक घडी सर्वांची बिघडली. मात्र, या काळात काही लोकांनी अनेकांना आधारही देण्याचे काम केले. मग त्यात अन्न असो, राहायला घर असो, भाडे न घेणे असो, किंवा मोफत प्रवास असो. अशा अनेक सेवा अनेकांनी दिल्या. अशीच काहीशी सेवा पुण्यातील एका युवक रिक्षा चालकाने लॉकडाऊनच्या काळात सुरू केली आणि ती सेवा पुढेही सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्याने केला आहे. रिक्षाचालक धनंजय करे ( Pune autorickshaw Dhananjay Kare ) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस बांधव आणि अपंग व्यक्तींसाठी मोफत रिक्षा सेवा ( Pune autorickshaw driver gave free service ) देत आहे. तसा माहिती देणारे बोर्ड देखील त्याने रिक्षाच्या बाहेर लावला आहे.

माहिती देताना रिक्षाचालक धनंजय करे

हेही वाचा -Pune Boy Dog Crime : 'तो' 2 वर्ष 22 श्वानांसोबत खोलीत राहिला 'बंद', पाहा, VIDEO...

अशी सुरू केली सेवा -कोरोनाच्या काळात सर्वच सेवा बंद असताना काही पोलीस आणि अपंगांना जर काम असायचे तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशातच आपल्या घरातील आपली छोटी बहीण ही अपंग असून तिला जो त्रास झाला आहे तो इतरांना होऊ नये म्हणून मी ही सेवा लॉकडाऊनच्या काळापासून सुरू केली आणि ती अशाच पद्धतीने पुढे सुरू ठेवणार, असे धनंजयने सांगितले.

लॉकडाऊनच्या काळापासून देत आहे सेवा -पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरात राहणारा धनंजय हा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रिक्षा चालवण्याचे काम करतो. त्याचा अपघात झाल्याने त्याला देखील अपंगत्व आले. त्यातून त्याला अपंगांचा त्रास जाणवू लागला. तसेच, कोरोना काळात पोलीस जे काम करत होते ते त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिले. त्यातून त्याला जाणीव झाली की, आपण अपंग आणि पोलिसांना मोफत सेवा देण्याचे काम करायचे. पोलीस आणि अपंगासाठी मोफत सेवा, असे त्याने आपल्या रिक्षाच्या मागे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. धनंजय हा कोरोनापासून आतापर्यंत अपंग आणि पोलिसांना मोफत सेवा देण्याचे काम करत आहे आणि पुढेही करत राहणार असल्याचे धनंजयने सांगितले.

..तोपर्यंत मी मोफत सेवा देत राहणार -धनंजयने आतापर्यंत सत्तरहून अधिक पोलिसांना आणि शंभरहून अधिक अपंगांना मोफत सेवा देण्याचे काम केले आहे. शिवाय अपंगांना स्वतःचा नंबर देऊन तुम्हाला कधी मदत लागली तर कॉल करा, असे आवाहनही त्याने केले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धनंजय ही सेवा देत आहे. तसेच निगडीपासून कात्रज पर्यंत आणि पुन्हा पुण्यातून जिथे ग्राहकाला जायचे आहे त्या ठिकाणी त्याने सोडले आहे. धनंजय करत असलेल्या या सेवेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पोलीस आणि अपंगांसाठी धनाजी हा सेवादूतच आहे. जोपर्यंत मी रिक्षा चालवणार तोपर्यंत मी मोफत सेवा देत राहणार असेही धनंजय याने सांगितले.

महागाईच्या काळातही देतो माणूसकीची सेवा -आज महागाईच्या या काळात पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. मात्र, धनंजय सारखी माणसे या गोष्टींचा विचार न करता समाजाप्रती असणारी जाणीव लक्षात घेऊन माणूसकीच्या नात्याने अशी चांगली सेवा देण्याचे काम करत आहे. त्याच्या या कार्याला सलाम.

हेही वाचा -Artificial Organ Transplant : कृत्रिम अवयव प्रत्यारोपण केंद्रात 60 हजारा पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार

ABOUT THE AUTHOR

...view details