महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

sextortion in pune : मोबाईलवर चॅटिंगनंतर न्यूड कॉलिंग; तरुणीच्या मानसिक त्रासाने तरुणाने संपवले जीवन - young man suicide due to mental harassment

पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला ( Shocking incident in Pune ) आहे. पुण्यातील धनकवडी येथे ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी (Threat of uploading nude videos on social media) देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस ( young mans suicide is revealed ) आला आहे. (mental harassment by woman and sextortion in pune)

The young man ended his life
मानसिक त्रासाने तरुणाने संपवले जीवन

By

Published : Oct 11, 2022, 10:12 AM IST

Updated : Oct 11, 2022, 7:11 PM IST

पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला ( Shocking incident in Pune ) आहे. पुण्यातील धनकवडी येथे ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी (Threat of uploading nude videos on social media) देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस (young mans suicide is revealed ) आला आहे. (mental harassment by woman and sextortion in pune)

तरुणीच्या मानसिक त्रासाने तरुणाने संपवले जीवन


माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा :अमोल राजू गायकवाड राहणार तानाजी नगर, धनकवडी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या केलेला २५ वर्षीय तरुण हा धनकवडीत रहायला होता. त्याने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

न्यूड व्हिडीओ अपलोड करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईविषयी माहिती देताना


तरुणासोबत चॅटिंग : दोन अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने तरुणासोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर तरुणास ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून वेळोवेळी पैसे घेऊन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्या तरुणाला याचा त्रास होऊ लागला.


तरुणीच्या धमक्यांमुळे आत्महत्या :अखेर अमोलने तिला संदेश पाठविला की, मैं सुसाईड करा रहा हूँ. त्यावर तिने करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हूँ, अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे अमोल ने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद तरुणाच्या भावाने सहकारनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

कॉलला कोणीही बळी पडू नये : अमोल गायकवाड यांचा मोठ भाऊ शुभम गायकवाड म्हणाला की, सध्या सोशल मीडियावर अशा प्रकारे जे मॅसेज किंवा कॉल येतात. त्याला कोणीही बळी पडू नये. लगेच पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. आपल्या मित्रांना कल्पना द्या पण अशा फेक लोकांपासून सावध रहा. कारण आम्ही आमचा भाऊ गमावला आहे अस यावेळी शुभम याने सांगितल.


न सांगता उचलले टोकाचे पाऊल : एक वर्षापूर्वी वडिलांचा निधन झालं त्यानंतर मी आई आणि माझा छोटा भाऊ अमोल आम्ही तिघच राहत होतो. चांगल चालल होत. घरात देखील आम्ही भाऊ एकत्र राहत होतो. पण सोशल मीडियावर अशा व्हिडियो व्हायरल मुळे माझी बदनामी होईल अस विचार करून माझ्या छोट्याश्या भावाने आपला आयुष्य संपवलं. आज जर तो त्याच्या मित्र किंवा मला सांगितल असत तर मार्ग निघाला असता. पण न सांगता अस टोकाचा पाऊल उचल आहे. मी आवाहन करेल की लोकांनी अशा सोशल मीडियावरील फेक गोष्टींपासून सावध राहायला हव, अस देखील यावेळी शुभम याने सांगितल.


व्हिडिओ सोशल करण्याची धमकी :30 सप्टेंबर ला सकाळी अमोल हा जिम मधून घरी आला. दरोरोज प्रमाणे 1 वाजेपर्यंत पबजी खेळत होता. दुपारी 1 वाजल्याच्या सुमारास त्याला मॅसेज आलं आणि कॉल आलं आणि तेथून ते चार वाजेपर्यंत चॅटिंग सुरू होती. दोन अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली होती. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने अमोल सोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर अमोल याला ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे 12 हजार रुपयांची मागणी केली. या दरम्यान अमोल ने 4500 रुपये तिला दिले देखील. पण अजून पैसे पाहिजे म्हणून अमोल याला मॅसेज येऊ लागले. अखेर अमोलने तिला संदेश पाठविला की, मैं सुसाईड करा रहा हूँ. त्यावर तिने करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हूँ, अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे अमोल ने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात 4 वाजल्याच्य सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.


अशा वेळेस मित्रांना माहिती द्यावी : मित्रांमध्ये आणि मित्रांना जीव देणारा अमोल हा आमचा मित्र होता. पण जेव्हा हे झालं तेव्हा त्याने आम्हाला ही सांगितल नाही की मी अस काही करतोय किंवा मला संबंधित अशी व्यक्ती त्रास देत आहे. आमचं सर्वांना आवाहन आहे की आम्ही जीवाला जीव देणारा मित्र या सोशल मीडिया वरील फेक अकाउंट मुळे गमावला आहे. सर्वांनी अशा बाबतीत सावधानता बाळगणे गरजेचं आहे अशा वेळेस मित्रांना माहिती द्यावी. अस देखील यावेळी अमोल च्या मित्रांनी सांगितल आहे.

Last Updated : Oct 11, 2022, 7:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details